Friday, July 17, 2009

प्रिय वाचक मित्रांनो,
सध्या माझ्या "लाज वाटते राजे ... या जगात जगावं लागतं " या कवितेला सर्वदूर मिळत असलेल्या प्रतिसादाने मी खरंच खूप भरवून गेलोय... आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...!
" मला वाटतं परिस्थिती ही खरंच खुप अवघड होत चाललेय.....
शिवाय ही खरच खूप चिंताजनक बाब आहे असं मला वाटतं ...
आपण सर्वांनीच याचा गाम्भिर्याने विचार करायला हवा ....!
मी स्वतः नेहमीच सर्व प्रकारचे कायदे आणि नियम पाळन्याचा पुरेपुर प्रयत्न करतो .
शक्यतो आपण स्वतः योग्य वागले तर मला वाटते की समोरून चांगला प्रतिसाद येतोच.
प्रत्येक चुकीच्या ठिकाणी मी नेहमीच प्रतिकाराची भूमिका घेतो.
चूक मग ती कुणाचीही असो स्पष्ट सांगायला मी अजिबात लाजत, घाबरत वा दबत नाही.
सरकारी वा खाजगी यंत्रणेला त्यांच्या कर्तव्याची सतत जाणीव करुन द्यावीच लागते।"
मला छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल अपार आदर आहे.
मला जर कधी त्यांच्या संदर्भात काही काम करता आले.. तर मी मराठी माणूस म्हणून स्वतः ला फार भाग्यवान समजेन.
ही कविता प्रत्येक सर्वसामान्य मराठी माणसापर्यन्त, प्रत्येक शिवभक्तापर्यन्त पोहोचावी अशी माझी अतीव इच्छा आहे.
*
शक्य झाल्यास आपण ही कविता आपल्या सर्व मित्र परिवारापर्यंत, सर्व शिवभक्तांपर्यन्त पोहोचवावी ही नम्र विनंती.*

आपल्याला जर ही कविता आवडली असल्यास.. आपणासाठी तसेच कुणालाही भेट म्हणुन देण्यासाठी....
या कवितेचे पोस्टर क्यालेन्डर अत्यल्प किंमतीत उपलब्ध आहे...
कृपया आपल्या विषयी अधिक माहिती तसेच आपला सम्पर्क क्रमांक असल्यास
ई - मेल द्वारे अवश्य कलवने किंवा फोन करीत जावे.

* या कवितेचे सर्व प्रकाशन हक्क प्रकाशकाला विकलेले असल्याने या कवितेचे पुनर्मुद्रण, फ्लेक्स, प्रिंट, सादरीकरण, जाहीर वाचन या संदर्भात त्यांची परवानगी घेणे कौपी राईट अक्ट नुसार आवश्यक आहे.



Plz use Mozilla Firefox Browser to view this Blog.........


Sunday, July 5, 2009

Prarambha

नमस्कार मित्रांनो,
आजपासून मी सुरु करतोय माझा स्वतः चा ब्लॉग लिहायला...
"गुरुराज गर्देचा ब्लॉग" या नावाने ...
माझ्या मनातील व्यथा, वेदना, सल, उद्वेग, त्वेष आणि इतरही भावना सहज व्यक्त करता यावं म्हणून...
आपण सर्वजण माझ्या लेखनासाठी प्रेरणा ठरणार आहात।
तुम्हांला मनःपूर्वक धन्यवाद ...!

Plz use Mozilla Firefox Browser to view this Blog.........