“मला भेटलेली देवमाणसे....”
मला ब-याचदा लोक विचारतात की, “तुमचा
देवावर विश्वास आहे का? नाही, तुम्ही ब्राह्मण जातीत जन्माला आलात, पूजाअर्चा, धार्मिक
कार्य वगैरे करता. म्हणजे तुम्ही देवधर्म, जात पात
वगैरे मानत असलाच ना?”
असा प्रश्न विचारला की मला अशा लोकांची कीव कराविशी वाटते.
मी त्यांना हसून सांगतो, “की मी देव मानतो ही आणि मानतही नाही.” लोक माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघतात. मग मी त्यांना
म्हणतो, “माझा माणसातल्या देवावर विश्वास आहे, मी
माणसातल्या देवाला मानतो.”
मला आजवर अनेक वेळा देव भेटलाय माणसांच्या रुपाने.
वेगवेगळ्या जातीतला, वेगवेगळ्या धर्मातला देव. कित्ती नावे म्हणून सांगू? आज
प्रत्येकाचे एक स्वतंत्र व्यक्तिचित्र माझ्या डोळ्यांसमोर येतेय. अगदी ठळकपणे....!
बांद्यासारख्या
छोट्याशा खेडेगावापासून ते आजपावेतो. मला भेटलेली, प्रत्यक्ष
न भेटताही आयुष्यात भेटलेली, माझ्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव टाकलेली, मला
निराशेच्या क्षणी जगण्यास प्रवृत्त करणारी, मला सतत
मार्गदर्शन करणारी, प्रोत्साहित करणारी, तुम्हांला
अपरिचित किंवा क्वचित परिचितही असणारी.
तुम्ही म्हणाल,
की ही तर सर्वसामान्य माणसेच आहेत. हो
असतीलही, पण माझ्यासाठी ही सगळीच देवमाणसे आहेत. कायम, आयुष्यभर
पुरतील असे आशीर्वाद, मदत आणि माझ्यावर अगणित उपकार केलेली. कदाचित त्यांना याची
कल्पनाही नसेल की, माझ्या मनात त्यांच्याविषयी आजही किती अपार श्रद्धा आहे. पण
या सगळ्या देवमाणसांच्या सहवासात मी सतत असतो. त्यामुळेच मला जगण्याचे बळ मिळते. नवे
चांगले विचार करण्याची शक्ती मिळते.
“मला भेटलेली देवमाणसे” या
सदरातून मी माझ्या आयुष्यातील अशाच काही व्यक्तिरेखा तुमच्यापर्यंत पोहोचविणार
आहे. तुम्हांला ही व्यक्तिचित्रे नक्की आवडतील अशी अपेक्षा आहे.
आपला विनम्र,
-------- गुरूराज ग. गर्दे.
शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता.
पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
सहजसंपर्क :-
What's App - 9422058288
Mobile - 9021501924
gururajgarde@gmail.com
-------- गुरूराज ग. गर्दे.
शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता.
पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
सहजसंपर्क :-
What's App - 9422058288
Mobile - 9021501924
gururajgarde@gmail.com
No comments:
Post a Comment