" गटारी स्पेशल "
प्रा. गुरुराज गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजलेली एक हटके " गटारी स्पेशल " हजल आज पुन्हा, तुम्हां Face Book आणि Whats Up च्या रसिक वाचकांसाठी.
("चांदणझुला" मधून... ) Mobile - 9021501924 / 9422058288
गटारी साठी माझ्या सर्व मित्रांच्या खास आग्रहावरून ही " गटारी स्पेशल " हझल लिहिलेली आहे..
माझे परमस्नेही आणि गझलगुरू गुरुवर्य इलाही जमादार यांची मूळ गझल "चांदण्यासाठी असे हे जागणे आता पुरे...." तसेच माझे आणखी एक प्रेमळ स्नेही सुप्रसिद्ध गझलनवाज गझलगायक भीमराव पांचाळे यांनी स्वरसाज चढविलेल्या या गझलेचे विडंबन म्हणजे ही हझल ----
(या दोन्ही मान्यवरांची मनापासून क्षमा मागून...)
बाटली हातात धरुनी, झिंगणे आता पुरे,
या गटारीला गटारी, लोळणे आता पुरे.
हा अवेळी पावसाळा, लागतो ओला कसा?
चार महिन्यांचा हा दुरावा, भोगणे आता पुरे.
बायकोला सांगुनी मी, सटकलो आहे खरा,
परतुनी जाता घरी त्या, अडकणे आता पुरे.
दोस्त जमुनी ठरवती हे, कोंबडा कापायचा,
तांबड्या रस्श्याविना ते, चाखणे आता पुरे.
बोळकांडी तुडवुनी मी, बार सारे शोधले,
शोधण्यासाठी पिलेली, उतरणे आता पुरे...
जाग सा-यांना असावी, फोडतो मी बाटली,
कोरडा हा पेग नुसता, मारणे आता पुरे..
राहवेना घेतल्याविण, दोन घुटके प्यायचे,
पाहुनी चकण्यास खाता, थांबणे आता पुरे.
दोस्तहो, तुमच्या कृपेने, रिचवितो आहे पुन्हा,
जास्त होता पेग माझे, उलटणे आता पुरे...
हे पहा मी मात्र आता, ग्लास उलटा ठेवला,
आग्रहास्तव दोसतीच्या, ओतणे आता पुरे...
आमची झाली गटारी, त्रास त्यांना जाहला,
भुंकणा-यांनो असे हे, भुंकणे आता पुरे....
----- स्नेहसखा गुरुराज.
Mobile - 9021501924 / 9422058288
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
माझी कोणतीही गझल / कविता आवडली तर कृपया, माझ्या नावासह व नंबरसह फॉरवर्ड करावी. ही नम्र विनंती.
प्रा. गुरूराज ग. गर्दे.
शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता.
पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924
What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com
Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor
No comments:
Post a Comment