Wednesday, September 16, 2015

श्री गणेश पूजा साहित्य, विधी, मंत्र आणि नैवेद्याविषयी उपयुक्त माहिती




नमस्कार मित्रांनो,
श्री गणेश पूजा साहित्य, विधी, मंत्र आणि नैवेद्याविषयी उपयुक्त माहिती
Chaturthi Tithi Begins = 20:01 on 16/Sep/2015
Chaturthi Tithi Ends = 22:20 on 17/Sep/2015
   श्रींच्या पूजनाचे मुहूर्त. गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०१५.
ब्राह्मो मुहूर्तापासून मध्यान्हापर्यंत अर्थात पहाटे ४.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत श्रींची प्राणप्रतिष्ठापना केली तर तो अमृतयोग समजला जातो.

श्रींची षोडशोपचार पूजा
श्री गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानावर बांधण्याकरिता नारळ , आंब्यांचे डहाळे किंवा तोरण. पाण्याने भरलेला तांब्या , पळी , पंचपात्र , ताम्हन, समई, नीरांजन, शंख, घंटा, हळद, कुंकू, अबीर, शेंदूर, गुलाल, रांगोळी , दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने, सुपा-या, विविध प्रकारची फुले, पत्रपूजेसाठी वेगवेगळी पत्री, पंचामृत, वस्त्र, जानवीजोड, उदबत्ती, कापूर, खारीक, बदाम, नारळ , फळे प्रसादाकरता मोदक किंवा मिठाई .
गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करण्यापूर्वी....
कुठल्याही मंगलकार्याला सुरुवात करताना विघ्नहर्त्या श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. श्रीगणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी मंगलस्नान करावे, पूजादी नित्यविधी करावेत. घरच्या देवांना, सर्व ज्येष्ठ व्यक्तींना आणि ब्राह्मणाला नमस्कार करून, कुलदेवतेचे स्मरण करून, पूजेला सुरुवात करावी. रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून मूर्ती स्थापन करावी आणि मग आचमन, प्राणायाम या विधींनी पूजेला सुरुवात करावी.
आचमन :  
ॐ केशवाय नम:। ॐ नारायणाय नम:। ॐ माधवाय नम:। या नावांनी दोनदा आचमने करावी.
ॐ गोविंदाय नम:। या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा.
आसनशुध्दी : भूमीला स्पर्श करून ही शुध्दी करावी लागते.
भूतोत्सारण : हातात अक्षता घेऊन दक्षिणेस फेकाव्या.
षडंगन्यास : शरीरशुध्यर्थ मांडी घालून दोन्ही हातांनी न्यास करावे.
कलश पूजा : पाणी भरलेल्या कलशाला गंध-अक्षता लावलेले फूल चिकटवावे.
भारतीय संस्कतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक. शुभकार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे. चारही वेदांचे यात वास्तव्य मानले असून आपल्या सहा अंगांसह सर्व वेद या कलशात आहेत.
शंखपूजा : शंखाला स्नान घालून गंध, पुष्प घालावे. शंखमुद्रा दाखवून नमस्कार करावा.
घंटा-पूजा : घंटानादं कुर्यात्-घंटा वाजवावी. घंटेला गंध,अक्षता, फूल, व हळदकुंकू वाहावे.
दीपपूजा : समईला फुलाने गंध, फूल व हळदकुंकू लावावे.
प्रोक्षण : दुर्वांनी पूजा साहित्यावर व स्वत:वर पाणी शिंपडावे.
प्राणप्रतिष्ठा : दोन दुर्वांकुरांनी गणपतीला स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी. ताम्हनात एक पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे. नंतर दुर्वांकुरांने गणपतीच्या पायाला स्पर्श करावा.
अभिषेक : गणपतीवर फुलाने किंवा दुर्वांकुराने पाणी शिंपडावे आणि अभिषेक करावा.
आचमन :-
(१) ॐ केशवाय नमः । (२) ॐ नारायणाय नमः । (३) ॐ माधवाय नमः । (४)ॐ गोविंदाय नमः। (५) ॐ विष्णवे नमः । (६) ॐ मधुसूदनाय नमः । (७) ॐ त्रिविक्रमाय नमः। (८) ॐ वामनाय नमः । (९) ॐ श्रीधराय नमः । (१०) ॐ हृषीकेशाय नमः । (११) ॐ पद्मनाभाय नमः । (१२) ॐ दामोदराय नमः । (१३) ॐ संकर्षणाय नमः । (१४) ॐ वासुदेवाय नमः । (१५) ॐ प्रद्युम्नाय नमः । (१६)ॐ अनिरुद्धाय नमः । (१७) ॐ पुरुषोत्तमाय नमः । (१८) ॐ अधोक्षजाय नमः । (१९) ॐ नारसिंहाय नमः । (२०) ॐ अच्युताय नमः । (२१) ॐ जनार्दनाय नमः । (२२)ॐ उपन्द्राय नमः । (२३) ॐ हरये नमः । (२४) ॐ श्रीकृष्णाय नमः ।
प्राणायाम :-
प्रणवस्य परब्रह्मऋषिः । परमात्मा देवता । दैवी गायतीच्छंदः । प्राणायामे विनियोगः
ॐभूः ॐ भुवः ॐस्वः ॐमहः ॐजनः ॐतपः ॐसत्यम् ।
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात
ॐ आपो ज्योती र्सोऽमृतं ब्रह्म भुर्भुवः स्वरोम ।
ताम्हणात एक पळी पाणी सोडून, नंतर आपला उजवा हात उजव्या कानाला व डाव्या कानाला लावावा.
यानंतर ध्यान करावे. हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावे. आपली दृष्टी आपल्या समोरील देवाकडे लावावी. हातात अक्षता घेऊन सर्व देवतांचे, आई वडिलांचे, गुरुजींचे स्मरण करून पूजेचा संकल्प करावा.
देवतास्मरण :
ॐ श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम:। मातापितृभ्यां नमः । श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।
निर्विघ्नमस्तु || सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप: ॥ धूम्रदेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नानानि यः पठेच्छृणुयादपि ॥ विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥ शुल्कांबरधरं देवं शशिवर्ण चतुर्भुजम । प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये ॥ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमास्तु ते ॥ सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममंगलम । येषा हृदिस्थो भववान मंगलायतनम हरिः ॥ तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीप्ते तेऽङघ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषा कुतस्तेषां पराजयः । येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः । विनायकं गुरूं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान । सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥ अभीप्सितार्थसिद्धार्थ पूजितो यः सुरासुरैः । सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः ॥ सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशंतु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥
देशकालउच्चारण :-
श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके १९३७ व्यावहारिके मन्मथनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ गुरुवासरे स्वातीदिवसनक्षत्रे ऐंद्रयोगे वणिजकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ ....

संकल्प :-
मम आत्मन: श्रुतिस्मृति पुराणोक्त, फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ्यं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं पार्थिव सिद्धिविनायक देवतापूजनमहं करिष्ये , असा मंत्र म्हणून हातातल्या अक्षता पाण्याबरोबर ताम्हनात सोडाव्यात...
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे | कविं कवीनामुपमश्रवस्तमम् । ज्येष्ठराजं ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पत | आ नः शृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॥ ॐ महागणाधिपतये नमः ॥
 त्यानंतर कलश , शंख , घंटा आणि दीपदेवतेची गंध, अक्षता, फुले वाहून पूजा करावी...
अथ कलश पूजा:-
कलशस्य मुखे विष्णु,कण्ठे रुद्र समाश्रितः | मूले तत्र स्थितो ब्राह्मो मध्ये मातृगणास्मृतः || कुक्षौ तु सागरासर्वे सप्तद्विपा वसुन्धरा | ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथवर्णः || अन्गैश्चसहिता सर्वे कलशाम्बुसमाश्रिताः | अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा || आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः | सर्वे समुद्राः सारिताः तीर्थानि जलदानदाः || गङ्गेच यमुने चैव गोदावरी सरस्वती | नर्मदे सिन्धु कावेरी जलेय्स्मिन्सिन्सन्निधिंकुरु || गंगा दि सर्वतीर्थेभ्यो नमः || कलश पूजां समर्पयामि.||
शंखपूजा :-
शङ्खादौ चन्द्रदैवत्यं वारुणंचादि दैवतं | पृष्ठे प्रजापति विद्यात् अग्रे गङ्गा सरस्वती|
त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया | शङ्खे तिष्ठन्ति विपेन्द्र तस्माद शङ्खं प्रपूजयेत् | त्वं पूरा सागरोत्पन्नः विष्णुना विधृतः करे || निर्मितः सर्वदेवैस्तु पाञ्चजन्य नमोस्तुते |
पवनाय नमः | पाञ्चजन्याय नमः | पद्मगर्भाय नमः | अम्बुराजाय नमः | कंबुराजाय नमः | धवलाय नमः |
ॐ पाञ्चजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् ||
शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।। 
अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.
घंटापूजा :-
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।
घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून मी गंध-फूल समर्पित करतो.
दीपपूजा :-
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: । आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी:-
ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.
त्यानंतर गणेशमूर्ती च्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा आणि मूर्ती च्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र आणि १५ वेळा ॐ म्हणावा.
पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा :-
प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे’, असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.
अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि।।
ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् ।
देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप – प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.)
अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।
नंतर `परमात्मने नम:।’ असे १५ वेळा म्हणावे किंवा ॐ म्हणावे.
"अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च। अस्यै देवत्वमर्चायै सुप्रतिष्ठीतमस्तु च।।१।। "
ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी. (टीप – हा मंत्र वेदोक्‍त आहे. )
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम्।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।।
उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । ध्यायामि ।।
षोडशोपचार पूजेत खालील उपचार (गोष्टी) येतात.
१. आवाहन, २. आसन, ३. पाद्य, ४. अर्घ्य, ५. आचमन, ६. स्नान, ७. वस्त्र, ८. यज्ञोपवीत, ९. गंध,
१०. पुष्प, ११. धूप, १२. दीप, १३. नैवेद्य, १४. नमस्कार, १५. प्रदक्षिणा, १६. मंत्रपुष्प.
फूल न मिळाल्यास फळ, ते न मिळाल्यास पानं, तीही न मिळाल्यास पाणी, तेही न मिळाल्यास शुभ्र म्हणजे धुतलेल्या तांदळांनी म्हणजेच अक्षतांनी देवांची पूजा करावी.
आवाहन - अक्षता वाहून देवाला आवाहन केलं जातं.
आसन - हा उपचार समर्पित करताना देवतेच्या बैठकीखाली अक्षता किंवा पाच फुलं ठेवतात. विष्णूच्या आसनाखाली तुळशीची पानं ठेवतात. शंकरासाठी बेल नि गणेशासाठी दुर्वा ठेवतात.
पाद्य - पाद्य उपचार मूर्तीच्या पायांवर फुलाने पाणी शिंपडून अर्पण केला जातो.
अर्घ्य - गंधमिश्रीत पाणी फुलाने मूर्तीवर शिंपडतात. अर्घ्यासाठी पाण्यात दही, अक्षता, कुशग्रं, दूध, दूर्वा, मध, यव आणि पांढरी मोहरीही घालतात.
आचमन - देवाला पिण्यासाठी आणि चूळ भरण्यासाठी पाणी देण्यालाच 'आचमन' म्हणतात. त्यासाठी पळीत पाणी घेऊन फुलाने चार वेळा मूर्तीवर शिंपडतात. या पाण्यात लवंग, वेलदोडा, वाळा, कंकोळही घालतात.
स्नान - यासाठी पळीत पाणी घेऊन दुर्वांनी किंवा फुलांनी ते मूर्तीच्या अंगावर शिंपडतात. तेल, उटण इत्यादींनी अभ्यंग घालून उष्णोदकाने स्नान घालतात्. पंचामृत स्नानासाठी दूध, दही, तूप मध आणि साखर यांचा वापर करतात.
पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि’ म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे.
उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे.
उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।।
उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । हरिद्राकुंकुमं समर्पयामि । (देवाला गंध, अक्षता, फुळ हळद, कुंकु वाहावे. ) धूपं समर्पयामि । दीपं दर्शयामि । नैवेद्यार्थे पंचामृतशेषनैवेद्यं च समर्पयामि ।
(देवाला उदबत्ती ओवाळावी, नीरांजन ओवाळावे, पंचामृताच्या वाटीभोवती पाणी फिरवावे व नैवेद्य दाखवावा.)
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा । उत्तरापोशनं हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णनिष्क्रदक्षिणां समर्पयामि ।
अनेन कृतपूर्वपूजनेन तेन श्री -------------- देवताः प्रीयन्ताम्‌ | उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्‌ ।
अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.
श्री गणपत्यथर्वशीर्षम्
हरि: ॐ नमस्ते गणपतये | त्ववेम प्रत्यक्षं तत्वमसि | त्ववेम केवलं कर्तासि |
त्ववेम केवलं धर्तासि | त्ववेम केवलं हर्तासि | त्ववेम केवलं खल्विदं ब्रह्मासि |
त्वं साक्षांदात्मासि नित्यं || १ ||
ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २ ||
अव त्वं माम् | अव वक्तारम् | अव श्रोताराम् | अव दातारम् | अव धातारम् | अवानूचानमव शिष्यम् |
अव पश्र्चात्तात | अवपुरस्तात् | अवोत्तरात्तात | अव दक्षिणात्तात् | अव चोर्ध्वात्तात् | अवाधरत्तात् |
सर्वतो मां पाहि पाहि समंतात् || ३||
त्वं वाड्.मयस्त्वं चिन्मय: | त्वमानंदमयस्तत्वं ब्रह्मामय: | त्व सच्चिदनंदाव्दितीयोsसि | त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोsसि || ४ ||
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्वत्तस्तिष्ठति | सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति | सर्वं जनदिदं त्वयि प्रत्येति | त्वं भूमिरापोsनलोsनिलो नभ: | त्वं चर्वारिवाक पदानि || ५ ||
त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: | त्वं कालत्रयातीत: | त्वं मूलाधारस्थितोsसि नित्यम् | त्वं शक्तित्रयात्मका: | त्वां योगिनोध्यायन्ति नित्यं |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णूस्त्वं रुद्रस्त्वमिंद्रस्त्वमग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्माभूर्वुव: स्वरोम् || ६ ||
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् | अनुस्वार: परतर: | अर्धेन्दुलसितं | तारेण ऋध्दं | एतत्तवमनुस्वरुपम् | गकार: पूर्वरुपम् | अकारो मध्यमरुपम् | अनुस्वारश्चांत्यरुपम् | बिंदुरुत्तररुपम् | नाद: संधानम् | सँहिता संधि: |
सैषा गणेशविद्या | गणक ऋषि | निच्ऋद्गायत्रीन्छद: | गणपतीर्देवता: ॐ गं गणपतये नम: || ७ ||
एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमही | तन्नो दंति: प्रचोदयात् || ८ ||
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणाम् | रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् |
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् | रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम |भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् | आविर्भूतं चसृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात्परम् |
एवं ध्यायंति यो नित्यं स योगी योगिनां वर: || ९ |||
नमो व्रातपतये | नमो गणपतये नम: | प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नम: || १० ||
(पुढिल स्तोत्र फक्त आवर्तने करतानाच म्हणावे, अभिषेक पूर्ण करण्यासाठी खालील ओळी म्हणाव्यात)
एतदथर्वशीर्षंयोधीते । सब्रह्मभूयायकल्पते ॥ ससर्वतःसुखमेधते ॥ ससर्वविघ्नैर्न बाध्यते ॥ सपंचमहापापात्प्रमुच्यते ॥ सायमधीयानो दिवसकृतंपापंनाशयति ॥ धर्मार्थकाममोक्षंचविंदति ॥ इदमथर्वशीर्षमशिष्यायानदेयम्‌ ॥ योयदिमोहाद्दास्यति ॥ सपापीयान्‌भवति ॥ सहस्त्रावर्तनात्‌ ॥ यंयंकाममधीते ॥ तंतमनेनसाधयेत्‌ ॥११॥
अनेनगणपतिमभिषिंचति ॥ सवाग्मीभवति ॥ चतुर्थ्यामनश्नन्‌जपति ॥ सविद्यावान्भवति । इत्यथर्वणवाक्यम्‌ ॥ ब्रह्माद्याचरणंविद्यात्‌ ॥ नबिभेतिकदाचनेति ॥१२॥
योदूर्वांकुरैर्यति ॥ सवैश्रवणोपमोभवति ॥ योलाजैर्यजति ॥ सयशोवान्भवति ॥ समेधावान्भवति ॥ योमोदकसहस्त्रिणयजति ॥ सवांछितफलमवाप्नोति ॥ यःसाज्यसमिद्भिर्यजि ॥ ससर्वंलभतेससर्वंलभते ॥ अष्टौब्राह्मणान्‌सम्यग्ग्राहयित्वासूर्यवर्चस्वीभवति॥ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा संनिधौ वाजप्त्वा सिद्धमन्त्रोभवति॥ महाविघ्नात्प्रमुच्यते ॥ महादिषात्प्रमुच्यते ॥ महापापात्प्रमुच्यते ॥ ससर्वविद्भवतिससर्वविद्भवति यएवंवेद ॥ इत्युपनिषत्‌ ॥१३॥
ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।
तेजस्विना वधीतमस्तु | मा विद्विषावहै |
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
वस्त्र - कापसाचं वस्त्र देवाला अर्पण करतात.
यज्ञोपवीत - पुरुष देवतांना यज्ञोपवीत (जानवं) अर्पण करतात.
गंध - देवाला चंदन, कस्तुरी, कापूर, कुंकू आणि जायफळ लेप लावतात.
श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
पुष्प - गणपतीला लाल पुष्प प्रिय आहे. विष्णूला चंपक, मलती, कुंद व जाईची फुलं आवडतात. शंकराला रुई, करवीर, द्रोण, कुश, धोतरा, नीलकमल प्रिय आहे .
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.
श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर)
श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर)
श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर)
श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर)
श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर)
श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर)
श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर)
श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर)
श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ पूजयामि ।। (खांद्यांवर)
श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)
श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर)
श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर)
श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर)
पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि’ असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी.
श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान)
श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका)
श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल)
श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा)
श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)
श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा)
श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस)
श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा)
श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी)
श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा)
श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर)
श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा)
श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई)
श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा)
श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण)
श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब)
श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार)
श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा)
श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड)
श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई)
श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)
यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.
ॐ गजाननाय नमः।
ॐ गणाध्यक्षाय नमः।
ॐ विघ्नाराजाय नमः।
ॐ विनायकाय नमः।
ॐ द्वैमातुराय नमः।
ॐ द्विमुखाय नमः।
ॐ प्रमुखाय नमः।
ॐ सुमुखाय नमः।
ॐ कृतिनॆ नमः।
ॐ सुप्रदीपाय नमः।
ॐ सुखनिधयॆ नमः।
ॐ सुराध्यक्षाय नमः।
ॐ सुरारिघ्नाय नमः।
ॐ महागणपतयॆ नमः।
ॐ मान्याय नमः।
ॐ महाकालाय नमः।
ॐ महाबलाय नमः।
ॐ हॆरम्बाय नमः।
ॐ लम्बजठरायै नमः।
ॐ ह्रस्व ग्रीवाय नमः।
ॐ महॊदराय नमः।
ॐ मदॊत्कटाय नमः।
ॐ महावीराय नमः।
ॐ मन्त्रिणॆ नमः।
ॐ मङ्गल स्वराय नमः।
ॐ प्रमधाय नमः।
ॐ प्रथमाय नमः।
ॐ प्राज्ञाय नमः।
ॐ विघ्नकर्त्रॆ नमः।
ॐ विघ्नहन्त्रॆ नमः।
ॐ विश्व नॆत्रॆ नमः।
ॐ विराट्पतयॆ नमः।
ॐ श्रीपतयॆ नमः।
ॐ वाक्पतयॆ नमः।
ॐ शृङ्गारिणॆ नमः।
ॐ अश्रितवत्सलाय नमः।
ॐ शिवप्रियाय नमः।
ॐ शीघ्रकारिणॆ नमः।
ॐ शाश्वताय नमः।
ॐ बल नमः।
ॐ बलॊत्थिताय नमः।
ॐ भवात्मजाय नमः।
ॐ पुराण पुरुषाय नमः।
ॐ पूष्णॆ नमः।
ॐ पुष्करॊत्षिप्त वारिणॆ नमः।
ॐ अग्रगण्याय नमः।
ॐ अग्रपूज्याय नमः।
ॐ अग्रगामिनॆ नमः।
ॐ मन्त्रकृतॆ नमः।
ॐ चामीकरप्रभाय नमः।
ॐ सर्वाय नमः।
ॐ सर्वॊपास्याय नमः।
ॐ सर्व कर्त्रॆ नमः।
ॐ सर्वनॆत्रॆ नमः।
ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः।
ॐ सिद्धयॆ नमः।
ॐ पञ्चहस्ताय नमः।
ॐ पार्वतीनन्दनाय नमः।
ॐ प्रभवॆ नमः।
ॐ कुमारगुरवॆ नमः।
ॐ अक्षॊभ्याय नमः।
ॐ कुञ्जरासुर भञ्जनाय नमः।
ॐ प्रमॊदाय नमः।
ॐ मॊदकप्रियाय नमः।
ॐ कान्तिमतॆ नमः।
ॐ धृतिमतॆ नमः।
ॐ कामिनॆ नमः।
ॐ कपित्थपनसप्रियाय नमः।
ॐ ब्रह्मचारिणॆ नमः।
ॐ ब्रह्मरूपिणॆ नमः।
ॐ ब्रह्मविद्यादि दानभुवॆ नमः।
ॐ जिष्णवॆ नमः।
ॐ विष्णुप्रियाय नमः।
ॐ भक्त जीविताय नमः।
ॐ जितमन्मधाय नमः।
ॐ ऐश्वर्यकारणाय नमः।
ॐ ज्यायसॆ नमः।
ॐ यक्षकिन्नेर सॆविताय नमः।
ॐ गङ्गा सुताय नमः।
ॐ गणाधीशाय नमः।
ॐ गम्भीर निनदाय नमः।
ॐ वटवॆ नमः।
ॐ अभीष्टवरदाय नमः।
ॐ ज्यॊतिषॆ नमः।
ॐ भक्तनिधयॆ नमः।
ॐ भावगम्याय नमः।
ॐ मङ्गलप्रदाय नमः।
ॐ अव्यक्ताय नमः।
ॐ अप्राकृत पराक्रमाय नमः।
ॐ सत्यधर्मिणॆ नमः।
ॐ सखयॆ नमः।
ॐ सरसाम्बुनिधयॆ नमः।
ॐ महॆशाय नमः।
ॐ दिव्याङ्गाय नमः।
ॐ मणिकिङ्किणी मॆखालाय नमः।
ॐ समस्त दॆवता मूर्तयॆ नमः।
ॐ सहिष्णवॆ नमः।
ॐ सततॊत्थिताय नमः।
ॐ विघातकारिणॆ नमः।
ॐ विश्वग्दृशॆ नमः।
ॐ विश्वरक्षाकृतॆ नमः।
ॐ कल्याणगुरवॆ नमः।
ॐ उन्मत्तवॆषाय नमः।
ॐ अपराजितॆ नमः।
ॐ समस्त जगदाधाराय नमः।
ॐ सर्वैश्वर्यप्रदाय नमः।
ॐ आक्रान्त चिद चित्प्रभवॆ नमः।
ॐ श्री विघ्नॆश्वराय नमः।
११. धूप : उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: । आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।। उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । धूपं समर्पयामि ।।
१२. दीप : आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।। भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)


१३. नैवेद्य : नैवेद्याला श्रींच्या समोर उकडीचे मोदक ठेवावेत. उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पुरतस्थापितमधुरमोदकनैवेद्यं निवेदयामि ।।
प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।। नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। फुलाला गंध लावून देवाला वहावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। यानंतर आरती करून कापूरारती करावी.

१४. नमस्कार : नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।। सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।। उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् । तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।। उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ।। दूर्वायुग्मसमर्पण

पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात. दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।’ असे म्हणावे. श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: । श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।। नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी. गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।। विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।। श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।
१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना :- कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अथ प्रार्थना । आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्‌ । पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ॥१॥ मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ॥२॥
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि । पुत्रान्‌ देहि धनं देहि सर्वान्‌ कामांश्च देहि मे ॥३॥
यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपःपूजाक्रियादिषु । न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम्‌ ॥४॥
उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नम:  । प्रार्थनां समर्पयामि ।
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे.
विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।

( यानंतर हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.)
अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहित श्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयताम् ।। प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।। आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।’ असे म्हणावे.
*************
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा. "यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।"

अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.

गणपति विसर्जनाच्या दिवशी पंचोपचार पूजा झाल्यानंतर "यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।" हा मन्त्र म्हणून देवावर अक्षता घालाव्या व मूर्ती हलवावी. म्हणजे उत्तरपूजा झाली.

संदर्भ :-
१. सनातन- निर्मित ग्रंथ,`गणेश पूजाविधी’ 
२.जोतिर्भास्कर दा. कृ. सोमण यांच्या महाराष्ट्र टाइम्स मधील लेखातून ही माहिती घेतली आहे.

संकलक :-
प्रा. गुरुराज गणेश गर्दे. - गुरुजी.
भास्करा एच ७०५, डीएसके विश्व,
धायरी, पुणे ४११०४१.
Contact :- 9422058288 or 9021501924

****************************
 नैवेद्यम...... नैवेद्यम...... नैवेद्यम...... नैवेद्यम...... नैवेद्यम......
उकडीचे मोदक मिळतील..
तसेच, ओल्या नारळाच्या करंज्या आणि डायबेटीस असणा-या गणेशभक्तांसाठी खास शुगर फ्री मोदक मिळतील, वर्षभर ऑर्डरप्रमाणे उपलब्ध....

गणेशोत्सव आणि दर महिन्यातील संकष्टीला, "श्रीं"च्या नैवेद्यासाठी खास सोवळ्यातील, गरमगरम उकडीचे मोदक ऑर्डरप्रमाणे वर्षभर मिळतील.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीहीे गणेशोत्सवातील १००० मोदकांची नोंदणी अगोदरच पूर्ण. आमच्या सर्व खवैया गणेशभक्तांचे आभार.
-: २०१५ चे दरपत्रक :-
उकडीचे मोदक रू. १९/- प्रती नग
२१ मोदक - रू. ३९९ फक्त/-
११ मोदक - रू. २०९ फक्त/-
 *************************************************
शुगर फ्री मोदक रू. २० /- प्रती नग
२१ मोदक - रू. ४२० फक्त/-
११ मोदक - रू. २२० फक्त/-
*************************************************
ओल्या नारळाच्या करंज्या रू. १९/- प्रती नग
२५ करंज्या - रू. ४७५ फक्त/-
१० करंज्या - रू. १९० फक्त/-
९४२२०५८२८८ वर आपली ऑर्डर आजच नोंदवा.
विशेष सूचना :-
* उकडीचे मोदक घरी येऊन घेऊन जावे लागतील.
* नो डिलिव्हरी.
* फक्त पार्सलसेवा उपलब्ध.
* येताना पुरेसा मोठा पसरट डबा आणावा.
* ओल्या नारळाच्या करंज्या आणि डायबेटीस असणा-या गणेशभक्तांसाठी खास शुगर फ्री मोदक यांची फक्त पुण्यातच* आणि केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच* फ्री होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध.

९४२२०५८२८८ वर आपली ऑर्डर आजच नोंदवा.

------- सौ. प्रिया गर्दे.
"गेली १२ वर्षे चवीची अखंड परंपरा"
व्यवसाय नव्हे, विश्वासपूर्वक चविष्ट सेवा.
*************************
Address :-
Gururaj Ganesh Garde.
Building Bhaskara,
Wing - H.
Flat No. 705,
DSK Vishwa, Dhayari,
Pune. 411041.
9422058288/9021501924
gururajgarde@gmail.com
*************************

No comments:

Post a Comment